शाळा ते लोकशाळा- एक विचार
महात्मा ज्योतिबा फुले यांनी १९व्या शतकात समाजातील वंचितांची विद्येविना कशी स्थिती झाली याविषयी लिहिले होते, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेलीनीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेलेवित्तविना शूद्र खचले, एवढे अनर्थ अविद्येने केले महिला, अस्पृश्य व मागासवर्गीय यांना शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी सनातनी लोकाचा विरोध, शिव्याशाप, बहिष्कार सहन केले व हजारो वंचितांना मुक्तीचा मार्ग दाखविला. त्यानंतरच्या …